सातारा : बहुजननामा ऑनलाईन – छत्रपतींचे दोन वंशज साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात असलेला वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. दरम्यान आमची दोन घराणी नाहीत, छत्रपतींचे घराण एकच आहे, असे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हणत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासोबतचा वाद मिटवण्याचे संकेत दिले आहेत.
शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद मिटण्याचे संकेत खुद्द छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत. मला फक्त आमदारकीत रस आहे. त्यामुळे मी विधानसभेची तयारी करत आहे, असं आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी साधलेल्या संवादात सांगितलं. छत्रपतींचं घराणं एकच आहे. त्या घराण्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, अशी कोणतीही कृती माझ्याकडून घडणार नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी उदयनराजेंसोबतचा वाद मिटवण्याचे संकेत दिले. शिवेंद्रराजेंच्या खांद्यावर उदयनराजेंच्या हात ; प्रात्यक्षिक देऊ का : शिवेंद्रराजेंचा टोला साताऱ्यातील जावळी येथील एका मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमप्रसंगी उदयनराजे गेले असता, ते शिवेंद्रराजेंची भेट झाली दरम्यान, दोघांमध्ये हस्तांदोलन झाले. याचबरोबर दोघांमध्ये जोरदार टोलेबाजीही झाली.
दरम्यान खासदार उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजेंचा खांदा दाबला त्यावेळी, तुम्ही माझा सारखा खांदा का दाबता ? असा सवाल शिवेंद्रराजेंनी विचारला असता, मी तुमची बॉडी चेक करत आहे. असे उत्तर उदयनराजेंनी दिले. दरम्यान मी उदयनराजेंच्या या उत्तराला तुम्हाला प्रात्यक्षिकही दाखवू शकतो असा टोला शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना लगावला.