यावेळी त्यांच्यासोबत भागातील ग्रामस्थ आणि स्थानिक अधिकारी उपस्थित होते. शिवाय दुष्काळी दौऱ्याच्या एका पथकाने गंगापूर तालुक्यातील मुरमी गावात शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पाहणी पथकासमोर त्यांची व्यथा मांडली.
तिसऱ्या पाहणी पथकानं जालन्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पथकानं जवसगाव आणि बेथलम गावांना भेट दिली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.हे पथक मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी तर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी भागांची पाहणी करणार आहे.
राज्यातील २६ जिल्ह्यांमधल्या १५१ तालुक्यांमध्ये राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ११२ तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर ३९ तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे.
गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले तालुके (११२)
सांगली (५) : जत, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, आटपाडी, तासगांव
सातारा (१) : माण-दहीवडी
सोलापूर (९) : करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर
पालघर (३) : पालघर, तलासरी, विक्रमगड
धुळे (२) : धुळे, सिंदखेडे
जळगाव (१३) : अमळनेर, भडगांव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल
नंदुरबार (३) : नंदुरबार, नवापूर, शहादा
नाशिक (४) : बागलान, मालेगांव, नांदगांव, सिन्नर
अहमदनगर (११) : कर्जत, अहमदनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, रहाता, रोहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड
बीड (११) : आष्टी, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, शिरुर (कासार), वडवणी, केज, आंबेजोगाई, परळी, पाटोदा,
जालना (७) : अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसांगवी, जाफ्राबाद, जालना, परतूर
नांदेड (२) : मुखेड, देगलूर
उस्मानाबाद (७) : लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम
परभणी (६) : मनवथ, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू
हिंगोली (२) : हिंगोली, सेनगाव
अमरावती (१) : मोर्शी
बुलडाणा (७) : खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा
यवतमाळ (६) : बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव
चंद्रपूर (१) : चिमूर
नागपूर (२) : काटोल, कळमेश्वर
मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले तालुके (३९)
पुणे (७) – आंबेगाव, पुरंदर, सासवड, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर, शिरुर-घोडनंदी
सातारा (२) – कोरेगांव, फलटण
धुळे (१) – शिरपूर
नंदुरबार (१) – तळोदे
नाशिक (४) – देवळा, इगतपुरी, नाशिक, चांदवड
हिंगोली (१) – कळमनुरी
लातूर (१) – शिरुर अनंतपाळ
अकोला (५) – बाळापूर, बार्शिटाकळी, मुर्तिजापूर, तेल्हारा, अकोला
वाशिम (१) – रिसोड
चंद्रपूर (४) – ब्रम्हपुरी, नागभिर, राजुरा, सिंदेवाही
नागपूर (१) – नरखेड