पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोंढवा परिसरातील येवलेवाडी येथील श्री गणेश ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या कामगाराचा गोळीबारात गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला होता. हा प्रकार २१ नोव्हेंबर रोजी घडला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा आणि कोंढवा पोलिसांनी संयुक्तरित्या करुन बिहार राज्यातून ४ आरोपींना अटक केली आहे.
कुंदन विजय सिंग (वय-२३), अमित विजय सिंग (वय-२०), रिशु संजय सिंग (वय-२१), विकास सुरेश सिंग (वय-१९ सर्व रा. तालुका हंसीकेवल जि. वैशाली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
येवलेवाडी येथे मालमसिंग देवडा यांचे श्री गणेश ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात अमरत परिहार हा मागील चार वर्षापासून काम करत होता. २१ नोव्हेंबर रोजी आरोपींनी दुकान येऊन परिहार याच्यावर गोळी झाडली झाली होती. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने परिहार याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेल आणि कोंढवा पोलिसांनी संयुक्तरित्या करुन बिहार राज्यातून चार आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपी पैकी कुंदन आणि रिशु सिंग हे कोंढवा येथील टिळेकर नगर भागात राहत होते. आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी हडपसर येथील डी मार्ट व कोंढवा येथील इस्कॉन मंदीराजवळून २ दुचाकी चोरल्या होत्या. गुन्ह्यात पकडले जाऊ नये यासाठी आरोपींनी दुचाकी डोंगराच्या कडेला सोडून दिल्या होत्या.
पोलिसांनी घटना घडल्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही आणि परिसरतील सीसीटीव्ही फुटजेच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. आरोपी बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करुन आरोपींना अटक कण्यात आली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे प्रदीप देशपांडे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग सुनिल फुलारी, परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ समीर शेख, वानवडी विभागाचे साहयक पोलीस आयुक्त मिलींद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, प्रॉपर्टी सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक निकम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महादेव कुंभार, कोंढवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बोधे, पोलीस उप निरीक्षक संतोष शिंदे, विवेक पाडवी, गुंडा विरोधी पथकाचे पोलीस उप निरीक्षक बडगुडे, पोलीस कर्मचारी विलास ढोले, विलास तोगे, इकबाल शेख, राजेंद्र शेख, शरद नवले, विशाल गवळी, पोलीस नाईक योगेश कुंभार, पृथ्वीराज पांडुळे, सुरेंद्र कोळगे, अमित साळुंखे, सचिन कळसाईत, गायकवाड, पोलीस शिपाई अजीम शेख, दिपक क्षिरसागर, उमाकांत स्वामी, आदर्श चव्हाण, संजु कळंबे, मिसाळ, वळे, उमेश शेलार, रिकी भिसे, प्रॉपर्टी सेलचे पोलीस हवालदार दिपक माटे, प्रविण तपकीर, सचिन ढवळे, जोतीबा पवार, शकील शेख, राकेश खुनवे यांच्या पथकाने केली.