अमरावती येथे काँग्रेसच्या जनसंघर्षयात्रे निमित्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आले असता, गेल्या साडेचार वर्षात जनतेचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षच सत्तेत हवा अशी जनतेची इच्छा आहे. जनभावना लक्षात घेत आम्ही जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी यवतमाळ येथून जनसंघर्ष यात्रेला सुरुवात केली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आम्ही पोहोणार आहोत. जनतेचे प्रश्न, त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि भाजप सरकारने जनतेची केलेली फसवणूक याबाबत आम्ही जनतेशी थेट संवाद साधणार आहोत. असे ते म्हंटले.विशेष म्हणजे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी निश्चत आहे. आम्हाला या आघाडीत प्रकाश आंबेडकरांची साथ हवी आहे. येणाऱ्या निवडणुकीत आघाडी संदर्भात भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. इतकेच नव्हे तर एमआयएम, भाजप आणि शिवसेना हे तीनही काँग्रेससाठी सारखेच आहेत असेही त्यांनी म्हंटले आहे.
याचबरोबर सध्या भाजप सरकारकडून आमच्या पक्षाच्या नेत्यांना कोणत्याही प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमचे फोन टॅप केले जात आहेत. मात्र, हा सगळा प्रकार जास्त काळ टिकणार नाही. असेही त्यांनी म्हंटले आहे.