पुणे : बहुजननाना ऑनलाईन शहराच्या विविध पाणीपुरवठा आणि पंपिंग स्टेशनमधील देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याने उद्या (गुरुवार) संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच या कामामुळे शुक्रवारीही (३० नोव्हेंबरला) बहुतांश भागात उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. दुरुस्तीच्या कामामुळे शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी केले आहे.
पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढीलप्रमाणे –
पर्वती जलशुद्धीकरण केंद्र :
शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, पर्वती गाव, मुकुंदनगर, सहकारनगर, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे क्र ४२, ४६ कोंढवा खुर्द, पर्वती आणि पद्मावती टँकर भरणा केंद्र.
चतु:शृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र :
पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतुःश्रृंगी परिसर, बावधन, बाणेर, चांदणी चौक, महात्मा सोसायटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी, गुरुगणेशनगर.
नवीन होळकर पंपिंग :
विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड परिसर
वडगाव जलकेंद्र :
हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक.
लष्कर जलकेंद्र :
लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, येरवडा परिसर, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, मुंढवा, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, गोंधळेनगर, सातववाडी.