मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – चंद्रशेखर आझाद यांच्या मुंबई नंतर पुण्यातील सभेला हि उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली असून चंद्रशेखर आझाद यांचे आज पुणे विद्यापीठात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पोलीस या प्रकरणात ४ जानेवारीला न्यायालयात शपत पत्र दाखल करणार असून चंद्रशेखर हे नजरकैदेत किंवा अटकेत नसल्याचा निर्वाळा पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच चंद्रशेखर यांना कोरेगाव-भीमाला जाण्यापासून रोखले जाणार नाही असे हि पोलिसांनी सांगितले आहे.
चंद्रशेखर उर्फ रावण यांना या आधी मुंबई मध्ये सभा घेण्यास नकार देण्यात आला होता. तसेच त्यांच्या पुण्यातील सभेला हि पोलिसांनी परवानगी नाकारली होती. आता त्यांना पुणे विद्यापीठात हि व्याख्यान देण्यास नकार दिला आहे. तर पूर्व नियोजना प्रमाणे आज गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे जाऊन चंद्रशेखर हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करणार असल्याची माहिती भीम आर्मी शहर अध्यक्ष दत्ता पोळ यांनी दिली आहे.
मुंबई येथे मागील तीन दिवसापासून नजर कैदेत ठेवण्यात आलेले चंद्रशेखर आझाद नजर कैदेतून मुक्त केल्या मुळे ते आता पुण्यात येऊ शकणार आहेत. त्याच प्रमाणे त्यांना शुक्रवारी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घ्यायला गेले असता त्यांना अटक करण्यात आली होती. मालाड येथील हॉटेल मध्ये त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले होते. सामाजिक संघटनांचा दबाव वाढत गेल्यावर त्यांची नजर कैदेतून सुटका करण्यात आली होती.
नजर कैदेतून सुटका केल्या नंतर आपण पुणे येथे जाऊन कोरेगाव-भीमाच्या विजयस्तंभाचे दर्शन घेणार आहे असे चंद्रशेखर आझाद म्हणाले होते.
वरळीमधील जांबोरी मैदानावर २९ डिसेंबर रोजी पार पडणारी सभा त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आल्या मुळे रद्द करण्यात आली होती. तर ३० डिसेंबरची पुण्यातील सभा पोलिसांनी परवानगी नाकारल्याने रद्द करण्यात आली होती. सभा करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केल्या नंतर त्यांच्या नजर कैदेतील मुक्तते साठी दबाव वाढत गेल्याने पोलिसांनी त्यांना अज्ञात स्थळी नेण्यात आले.
कोरेगाव-भीमाच्या विजयस्तंभाचे दर्शन घेण्याची परवानगी सोडून अन्य कोणतीच परवानगी चंद्रशेखर यांना देण्यात आली नसल्याने चंद्रशेखर यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची कायद्याच्या कचाट्यात गुंतवून हवा काढण्यात आली आहे. चंद्रशेखर हे आज पुण्यात दाखल होणार असून ते उद्या कोरेगाव-भीमाच्या विजयस्तंभाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर त्यांचे पुढील नियोजन काय असणार या बद्दल अद्याप माहिती मिळाली नाही.