२०१५ ते २०१८ या काळात अकोला आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांनी राबवलेल्या न्युक्लिअस बजेट, विशेष केंद्रीय सहाय्य योजनांमध्ये अनियमितता, तसेच चौकशीसाठी पुरावा देऊनही कारवाई होत नाही, याचबरोबर अधिकारी व लिपिकाने विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार केल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, लाभाची माहिती मागण्यासाठी गेलेले वासुदेव डाबेराव यांच्यावर केलेली फौजदारी कारवाई मागे घ्यावी, शासनाने सुरू केलेली डीबीटी योजना बंद करावी, वसतिगृहात भोजन व्यवस्था सुरू करावी, वसतिगृहाच्या इमारती भाड्याने न घेता स्वतंत्र निर्मिती करावी, आदिवासींच्या घरकुल योजनेचे अनुदान २ लाख रुपये करावे, अकोला आदिवासी प्रकल्पाने २०१५ ते २०१८ या काळात राबवलेल्या योजनांची एसआयटीमार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करावे. अश्या अनेक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या विरोधात १९ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
यावेळी आदिवासी विकास प्रकल्पाचे नियोजन व आढावा समिती अध्यक्ष अमरसिंग भोसले, भाजप अनुसूचित जमाती मोर्चा बुलडाणा जिल्हाध्यक्ष गजानन सोळंके, रामा डाबेराव, अंबादास डाबेराव, गजानन डाबेराव आदी उपस्थित होते.