दुष्काळाने त्रस्त झालेल्या मराठवाड्या सोबतच महाराष्ट्रही दुष्काळाच्या कळा सोसत आहे याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीन यांचा अकोला जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी अकोला आणि पातूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, याचबरोबर हरभरा तुरीचे अनुदान मिळाले नाही, तसेच अकोल्या जिल्ह्यात असलेल्या १६ रस्त्यानं मध्ये झालेला घोटाळा अश्या अनेक मागणीचे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी येथे गेले असता भारिप आणि बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी परिसरातच रोखण्यात आले.
त्यामुळे, भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्याधिकारी कार्यालय समोर निदर्शने करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मूक पने निषेध केला.
काय होत्या मागण्या ?
अकोला आणि पातूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा.
हरभरा तुरीचे अनुदान मिळावे.