पुणे : बहुजननामा ऑनलाइन – महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास बुधवारी फुरसुंगी येथे अतिक्रमण काढत असताना धमकी देऊन धक्का-बुक्की करण्यात आली. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी सुरज गायकवाड(२५,रा.हडपसर) याला ताब्यात घेतले आहे.
फुरसुंगी येथील पुणे-सासवड रस्त्यालगत असलेले अतिक्रमन काढण्यासाठी महापालिकेच्या पथकासह महापालिकेच्या अतिक्रमण विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेले विश्वनाथ बोटे हे गेले असता, बेकायदेशीर लावलेले स्टॉल व हातगाडीवर कारवाई करत असतांना त्यांच्या सरकारी गाडीला एक कार आडवी लावली. यानंतर बोटे व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच बघुन घेण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर हाताने त्यांना धक्का-बुक्की करत इतरांना चिथावणी देत यांच्या गाडीला गाड्या आडव्या लावा हे इथून जातातच कसे हे बघु असे धमकावले. दरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरपीआयचा कार्यकर्ता सुरज गायकवाड(२५,रा.हडपसर) यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी आरोपी सुरज गायकवाड यास ताब्यात घेतले असून अधिक तपस पोलीस उपनिरीक्षक शेंडगे करत आहेत.