समाजाला जातींमध्ये वाटल्या नंतर आता देवी देवतांना जातींमध्ये वाटण्याचे काम भाजपा करत आहे : मायावती 

December 6, 2018
लखनौ : बहुजननामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हनुमान दलित होते या वक्तव्यावर बहुजन समाज पार्टी च्या अध्यक्षा तसेच उत्तर प्रदेश च्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी टीका केली आहे. भाजपा सरकार मधील काही नेते आता समाजाला जातींमध्ये वाटल्या नंतर आता देवी देवतांना सुद्धा जातींमध्ये वाटण्याचे काम करत आहेत अशी टीका त्यांनी केली.

६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिना निमित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन करतांना बहुजन समाज पार्टी च्या अध्यक्षा तसेच उत्तर प्रदेश च्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी हनुमान दलित होते हे वक्तव्य केले होते. भाजपा सरकार इतक्या खालच्या ठरला जाईल असे वाटले नव्हते. इतकेच नव्हे तर मत मिळवण्यासाठी तसेच सरकार स्थापन करण्यासाठी देवी देवतांना तसेच लोकांच्या आस्थेलाही सोडत नाहीयेत. असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर भाजपावर जातीधर्माचे राजकारण करून समाजाला वाटण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर समाजाला जातींमध्ये वाटल्या नंतर आता देवी देवतांना सुद्धा जातींमध्ये वाटण्याचे राजकारण सुरु आहे. जातीवाद आणि धर्मवाद करणाऱ्यांपासून जनतेने सावध राहिले पाहिजे. असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर भाजपा सरकारचे संविधान बदलण्याचे षडयंत्र आहे, हे षडयंत्र हणून पाडण्याचे आवाहनही त्यांनी केले. याचवेळी काँग्रेसवर सुद्धा वंचित समाजातील लोकांसोबत अन्यायकेल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान काँग्रेसने आपल्या ६० वर्षाच्या कार्यकाळात सर्वसामाजातील गरीब , मजूर, शेतकरी, दलित, तसेच अल्पसंख्याक वर्गाना सर्व जण सारखेच आहोत या संविधानातील अधिकारा पासून लांब ठ्वले आहे. यामुळेच हे सर्व संघर्ष करावे लागले आहेत.  त्यामुळेच  या सर्व संघर्षानंतरही जातीयवादात अडकलेल्याने या समाजांची आज दयनीय अवस्था झाली आहे.

विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे  हनुमान दलित होते हे वक्तव्य  सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या आधारावर देशातील सर्व हनुमान मंदिर दलित पुजारींच्या हवाली करण्याची मागणी होत आहे.