संपूर्ण महाराष्ट्रात अल्पसंख्यांक पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण

November 19, 2018
बीड : बहुजननामा ऑनलाईन-महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांक विकास विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. अल्पसंख्यांक समाजातील मुलांनी पोलीस भरती प्रशिक्षणासाठी अर्ज करावे असे महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांक विकास विभागाकडून आवाहनही करण्यात आले आहे.

१९ नोव्हेंबरला पोलीस मुख्यालय नगर रोड बीड येथे सकाळी १० वाजता अर्ज करावेत, याच बरोबर अर्जकरणारा उमेदवार बारावी पास असावा, इतकेच नव्हे तर उमेदवाराचे वय १८ ते २० वर्षापर्यंत असावे, उंची १६५ सें. मी असावी, तसेच छाती ७९ सें.मी आणि फुगवून ८४ सें.मी असावी, तसेच वार्षिक उत्पन्न हे लाखांपर्यंत असावे.  

विशेष म्हणजे उमेदवाराने अर्जा सोबत सर्व शैक्षणिक सत्यप्रत जोडावे तसेच प्रशिक्षणार्थी उमेदवारास १५०० रुपये प्रतिमाह मानधन , चहापान, अल्पउपाहार, गणवेश,  बूट, बनियान, हे साहित्य देण्यात येणार आहे.   

उमेदवारांनी सत्य प्रति सोबत हजर राहून जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहनही महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून करण्यात आले आहे.