रामाने दलित हनुमानाला गुलाम केले – खा.सावित्रीबाई फुले
नवी दिल्ली : राष्ट्रीय वृत्तसंस्था – आपल्या विवादित वक्तव्यतून नेहमीच चर्चेत असलेल्या भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी आज हनुमानवर वादग्रस्त वक्तव्य करून पुन्हा हनुमानाच्या जात विषयक चर्चेला तोंड फोडले आहे. दलित हनुमानाला मनुवादी लोकांनी गुलाम केले असे त्या म्हणाल्या असून रामात जर ताकीद असती तर राम मंदिर मागेच झाले असते असे त्यांनी रामाला उद्देशून म्हणले आहे.
दलित हनुमान हे मनुवादी लोकांचे गुलाम होते तर राम हा मनुवादी होता. जर हनुमान दलित नव्हते तर त्यांना मनुष्य का बनवले गेले नाही ? त्यांना वानरच का ठेवले गेले. हनुमान रंगाने काळा होता त्याचा चेहरा काळाच का ठेवला असे खासदार सावित्रीबाई फुले म्हणाल्या आहेत.
दलित लोकांना वानर आणि राक्षस म्हणले जाते. हनुमान दलित होते म्हणून त्यांना वानर बनवले होते. हे सर्व रामाने केले होते असे फुले म्हणाल्या असून त्यांनी हनुमानाचा रामाने नेहमी अपमान केला आहे असे खळबळ जनक वक्तव्य केले आहे.
सावित्रीबाई फुले यांनी केला राम मंदिर मुद्यावर भाजपला घरचा आहेर
भाजपकडे निवडणुकीला कोणताच मुद्दा उरला नाही म्हणून त्यांनी राम मंदिराचा प्रश्न समोर केला आहे. राम मंदिर बांधल्याने दलितांच्या रोजगाराचे प्रश्न सुटणार असतील तर राम मंदिर बांधावे असा खोचक टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. मंदिर उभारल्यास देशात ३ टक्के असलेल्या ब्राह्मण समाजाला त्याचा लाभ होईल आम्हाला त्याचा कसलाच लाभ होणार नाही असे त्या म्हणाल्या तसेच दलितांना दिलेली आश्वासने पूर्ण करणे होत नसेल तर भाजपच्या लोकांनी खुर्च्या खाली कराव्या असा भेदक मारा त्यांनी भाजपवर म्हणजे आपल्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर केला आहे.
तर आपल्याच खासदारांने आपल्याला वास्तवाची प्रचितीकरून दिल्या नंतर भाजपचे प्रवक्ते चंद्रमोहन यांनी सावित्रीबाई फुले यांना फटकारले असून त्यांना भारतीय परंपरेचे ज्ञान नाही त्यामुळे त्या अशी वक्तव्य देत आहेत असे म्हणले आहे .
Comments are closed.