राजकारणात जिवंत राहण्यासाठी राज ठाकरे माझ्या नावाचा वापर करतात : असदुद्दीन ओवैसी
विक्रोळी येथील आयोजित सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन देशात दंगल घडवण्याचा कट आखण्यात आल्याचा दावा केला होता. इतकेच नव्हे तर ओवैसी बंधूंच्या मदतीने दंगली घडवण्याचा कट आखला जात असल्याचा दावाही त्यांनी केला होता. इतकेच नव्हे तर दिल्लीतील एका व्यक्तीने फोनवरून आपल्याला ही माहिती दिल्याचेही त्यांनी म्हंटले होते.
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या वक्तव्याला एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उत्तर प्रदेश, बिहारच्या लोकांवर तुम्ही हल्ले का करताय ? समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांनी आमच्यावर आरोप करण्याआधी जरा आत्मपरीक्षण करायला हवे. राजकारणात जिवंत राहण्यासाठी आमचे नाव घेत असाल, तर आमची हरकत नाही असे म्हणत ओवैसी यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
इतकेच नव्हे तर ‘दंगलीच्या कटाची माहिती असेल, तर पोलिसांना सांगा’, असा टोला लगावत शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या दाव्याची खिल्ली उडवली आहे.
Comments are closed.