• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘मी महात्मा फुले बोलतोय’  नाटक सादर करून केले आभिवादन 

by Prathmesh Girase
November 27, 2018
in उत्सव
0
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक  महात्मा जोतिबा फुले यांच्या १२८ व्या पुण्यतिथीनिमित्त भिडे वाडा बचाव मोहिमेच्या वतीने ‘मी महात्मा फुले बोलतोय’ हे नाटक सादर करून  समाजसुधारक  महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन  करण्यात आले.

भिडे वाडा बचाव मोहिमेच्या वतीने भिडे वाडा येथे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक  महात्मा जोतिबा फुले यांच्या १२८ व्या पुण्यतिथीनिमित्त आभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  ‘मी महात्मा फुले बोलतोय’ हे नाटक सादर करण्यात आले. इतकेच नव्हे तर महात्मा फुले यांचे समतेचे विचार या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. डॉ. विलास आढाव यांचे व्याख्यान झाले.

यावेळी, संदीप लडकत, नगरसेविका आरती कोंढरे, सुनीता भगत, राखी रासकर, मारुती जांभुळकर, आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिडे वाडा बचाव समितीचे संस्थापक प्रशांत फुलेयांनी केले. तसेच सूत्रसंचालन रोहिदास शिंद यांनी केले. याचबरोबर सपना माळी यांनी आभार प्रदर्शन केले.

जोतीराव गोविंदराव फुले

११ एप्रिल १८२७ कटगुण,सातारा,महाराष्ट्र येथे जोतीराव फुले यांचा जन्म झाला. गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव आहे. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांचेशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. दरम्यान  मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते.

‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकऱ्याचा असूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचे वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या ‘ सार्वजनिक सत्यधर्म ‘ संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे.त्यातील काही महत्वाची वचने लीहिली.  नंतर ते महात्मा फुले नावाने प्रसिद्ध, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली. ‘शेतकऱ्यांचे आसूड’ हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला. नोव्हेंबर २८, इ.स. १८९० पुणे, महाराष्ट्र येथे त्यांचे निधन झाले.

Tags: Dramaआभिवादनजोतीराव फुलेनाटकपुणेपुण्यतिथीबहुजननामा
Previous Post

शिष्यवृत्ती विद्यार्थांकडून पूर्ण शुल्क घेणाऱ्या महाविद्यालयांवर होणार कारवाई : विनोद तावडे

Next Post

महात्मा फुले यांच्या १२८ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कवीसंमेलन 

Next Post

महात्मा फुले यांच्या १२८ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कवीसंमेलन 

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

उत्सव

‘मी महात्मा फुले बोलतोय’  नाटक सादर करून केले आभिवादन 

November 27, 2018
0

...

Read more

‘देसी गर्ल’ प्रियंकाच्या ‘द व्हाईट टायगर’ सिनेमावर बंदी घालण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार ! जाणून घ्या प्रकरण

3 days ago

Varun Dhawan-Natasha Dalal Grand Reception : ‘या’ दिवशी होणार ‘वरुण-नताशा’च्या लग्नाचं ‘ग्रँड’ रिसेप्सन !

6 hours ago

आता Voter id झालं डिजिटल, जाणून घ्या मोबाईलमध्ये कसं करायचं Download

5 hours ago

फक्त 2 ‘इंचा’साठी कायपण, 28 वर्षीय तरूणानं ‘उंची’ वाढवण्यासाठी केला एवढा खर्च, तुम्ही वाचून व्हाल थक्क

4 days ago

वेबसिरीजमुळं ‘तांडव’, पोलिसांनी आ. राम कदम यांना घेतलं ताब्यात

6 days ago

LAC वरील ‘तणाव’ कमी करण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात 15 तास चालली 9 व्या फेरीतील चर्चा

7 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat