• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

महात्मा फुले : विचार आणि कार्य

by pawan
January 18, 2019
in समाजकारण
0
पुणे : बहुजननामा ऑनलाईन- (याेगेश सांगळे)-महात्मा जोतिबा फुले हे बहुजन समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे, बहुजन समाजाला विकासाच्या मुख्य धारेत आणणारे पाहिले नेते होत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांना गुरुस्थानी मानत. त्यांचे कार्य महान आहे. त्यांच्या कार्याबद्दल आपणा सर्वांना काही गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारांचा समाजात प्रसार होणे गरजेचे आहे. सर्व बहुजन काही मोजक्याच छत्राखाली एकत्र येऊ शकतात त्यांपैकी एक महात्मा जोतिबा फुले आहेत. त्यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया.
 
१) महात्मा फुले यांना ‘स्त्री शिक्षणाचे आद्यजनक’ असे म्हंटले जाते. मुलींसाठी आणि मागासलेल्या समाजातील मुलांसाठी त्यांनी शाळा सुरू केल्या. स्त्री-पुरूष सर्वांना शिक्षण मिळावे असा त्यांचा आग्रह असे. त्यांच्या मते शिक्षण हा मुक्तीचा प्रमुख मार्ग आहे. शिक्षणाचे महत्व सांगताना ते म्हणतात,
    
     विद्ये विना मती गेली। 
     मती विना निती गेली॥
     निती विना गती गेली।
     गती विना वित्त गेले।।
     वित्त विना शुद्र खचले। 
एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥
 
फुले बहुजनांच्या मागासलेपणाचे मुख्य कारण शिक्षणाचा अभाव हे सांगतात. एवढेच नाही तर त्यांनी १९व्या शतकाच्या मध्यावरंच बारा वर्षाच्या आतील मुलामुलींना मोफत शिक्षण देण्यात यावी अशी मागणी केली होती. याचबरोबर, ‘शिलसंवर्धन, सत्यनिष्ठा, नितीमत्ता, व्यवहारज्ञान यांवर शिक्षणात भर दिला पाहिजे’. यावरून आपल्याला हे समजते की त्यांनी केवळ घोकंपट्टी करायला लावणाऱ्या शिक्षणाचा पुरस्कार नाही केला तर शिक्षणाने माणूस घडला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.
 
 इतकेच नव्हे तर  कोणताही धर्म ईश्वराने निर्मिलेला नाही. चातुर्वर्ण्य आणि जातीभेद ही मानवाचीच निर्मिती आहे. ते ईश्वराला निर्मिक म्हणतात.  ते धर्माला ‘सत्यधर्म’ असे संबोधतात. ‘सत्य’ हाच सर्वांचा धर्म आहे. तसेच देवळातील पुरोहितांना ते विरोध करतात. ते म्हणतात, ‘सर्वसाक्षी जगतपती, त्यास नकोच मध्यस्ती’. ज्याप्रमाणे आपल्या आई बापाला भेटायला किंवा प्रसन्न करायला कुणाचीही गरज नसते. त्याच प्रमाणे ईश्वराला प्रसन्न करण्यासाठीही कुणा पुरोहिताची गरज नसते. महात्मा फुल्यांनी समाजसुधारनेसाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. त्यात प्रवेश मिळण्यासाठी वरील तत्व मान्य करण्याची अट होती. यावरून फुले धर्म किंवा श्रध्दा या व्यक्तीच्या वैयक्तिक गोष्टी असल्याचे मानत. ते निर्मिक आणि माणूस यांचे संबंध थेट असल्याचे सांगतात. ते संबंध कसे असावेत हे कुणीही ठरवू नये असे ते स्पष्टपणे सांगतात.
 
महात्मा फुलेंनी जातीव्यवस्थेवर सतत टीका केलेली दिसते. त्यांनी जातिव्यवस्थेचा निषेध केला. अस्पृश्यतेला विरोध केला. समाजाला काळीमा फासणाऱ्या यांसारख्या प्रथा संपवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यासाठी अस्पृश्य समाजातील लोकांसाठी त्यांनी आपल्या घरातील हौद पाणी भरण्यासाठी खुला केला. अस्पृश्यतेवर टिका करताना त्यांनी वेदानांही लक्ष्य केले. अस्पृश्यता वेदांमधील आख्यायिकांमधूनच जन्माला आली. वेद चुकीच्या गोष्टी पसरवतात. असे ते म्हणत. तसेच अवतार कल्पनेवरही त्यांनी प्रचंड टिका केली. तसेच ‘दलित’ या शब्दाचा सर्वप्रथम वापर महात्मा फुल्यांनी केला.
 
स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. इथे त्यांनी केवळ बहुजनांच्या स्त्रियांचा विचार नाही केला. तर उच्चजातीय स्त्रियांनाही त्यांनी आसरा दिला. स्त्री कुठल्याही जाती समाजातील असो तीचे स्थान दुय्यमच असते असे त्यांचे मत होते. आपल्या पत्नी सावित्रीबाईंना शिकवून त्यांच्यामार्फत मुलीपर्यंत शिक्षणाची गंगा त्यांनी पोचवली. विधवा स्त्रियांच्या मुलांसाठी त्यांनी अनाथाश्रम सुरू केला. त्याला त्यांनी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ असे नाव दिले. त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला. त्यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी त्यांची आयुष्यभर साथ दिली. किंबहुना सावित्रीबाई फुलेंचे विचार आणि कार्य यांचा आढावा स्वतंत्ररित्या घ्यावा  लागतो. पहिली भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून सारा देश त्यांना ओळखतो.
 
महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांना नेहमी वाचा फोडली. त्यासाठी त्यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हे पुस्तक लिहिले हे आपण जाणतोच. १९८५ साली स्थापन झालेल्या काँग्रेसवर त्यांनी ती संघटना शेतकरी आणि सामान्यजनांना सामावून घेत नाही म्हणून टिका केली. नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत देशातील पहिली कामगार संघटना उभी केली. त्यामागे प्रेरणा फुल्यांची होती. फुलेंनी शेतकरी कामगार यांच्या हक्कांसाठी शेवटपर्यंत लढा दिला. महात्मा फुले हे असे समाजसुधारक होते ज्यांनी समाजाच्या सर्व क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीय रत्न, शिवाज महाराजांचा पोवाडा इ. साहित्य लिहिले. ते वाचले पाहिजे. त्यांच्या विचारांचा प्रसार महाराष्ट्रभर- भारतभर झाला पाहिजे.
Tags: Mahatma PhulepuneThinkWorkकार्यपुणेमहात्मा जोतिबा फुलेविचार
Previous Post

लिंगायत समाजाचे १० डिसेंबरपासून धरणे आंदोलन

Next Post

शहिद शुभम मस्तापुरे यांना शिवा संघटनेचा ‘शिवा राष्ट्रीय शौर्य’ पुरस्कार प्रदान

Next Post

शहिद शुभम मस्तापुरे यांना शिवा संघटनेचा 'शिवा राष्ट्रीय शौर्य' पुरस्कार प्रदान

Multibagger Penny Stock Return | st corporation share delivered 1481 percent return stock skyrocketing continues 30 trading days
आर्थिक

Multibagger Penny Stock Return | रू. 13 चा हा शेअर 212 रुपयांचा झाला, लागोपाठ 30 दिवसांपासून रॉकेट स्पीड, जोरदार रिटर्न

June 27, 2022
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Multibagger Penny Stock Return | गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी काहीही चांगले नाही. मागील व्यवहाराच्या...

Read more
Pest Control | us company the pest informer pest control method 100 cockroaches offers 1 5 lakh rupees check details

Pest Control | जर तुमच्या घरात असतील 100 झुरळं, तर ‘ही’ कंपनी देत आहे 1.50 लाख रुपये, कारण आहे अतिशय खास

June 27, 2022
Maharashtra Rain Update | weather alert warning from meteorological department for next 3 4 hours in maharashtra

Maharashtra Rain Update | आगामी 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट – IMD

June 27, 2022
Bank Fraud | bank fraud vishing explained in marathi know safety tips

Bank Fraud | एका फोन कॉलद्वारे रिकामे होऊ शकते तुमचे बँक अकाऊंट, फॉलो करा ‘या’ टिप्स

June 27, 2022
Maharashtra Political Crisis | after supreme court decision the ball is in now governor bhagat singh koshyari court maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष

June 27, 2022
 SBI Toll Free Number | sbi started contact center service toll free number for 24x7 banking solution

SBI Toll Free Number | SBI मध्ये अकाऊंट आहे का ?, केवळ लक्षात ठेवा ‘हा’ एक नंबर, A to Z समस्या सुटतील

June 27, 2022
Pune PMC Water Supply | The rain turned its back! Water cut soon in Pune city

Pune PMC Water Supply | पावसाने पाठ फिरवली ! पुणे शहरात लवकरच पाणी कपात

June 27, 2022
Eknath Shinde | Eknath Shindes new tweet on Supreme Court decision Said This victory

Eknath Shinde | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट; म्हणाले..- ‘हा विजय…’

June 27, 2022
Bank Holidays | bank holidays in july 2022 bank will close 14 days in july 2022 check list

Bank Holidays | जुलैमध्ये 14 दिवस बंद राहतील बँका, तपासून घ्या बँकेच्या सुट्ट्यांची पूर्ण यादी

June 27, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

MNS On Thackeray Government | In Guwahati more than 33 shivsena mla on Varsha only few mla, secular on gas MNS's strong attack on shivsena as well as thackeray government
ताज्या बातम्या

MNS On Thackeray Government | ‘गुवाहटीत असली, ‘वर्षा’वर नकली अन् सेक्युलर गॅसवर’; मनसेचा जोरदार हल्लाबोल

June 22, 2022
0

...

Read more

Sanjay Raut | ‘महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार, पण…’ – संजय राऊत यांचं मोठं विधान

4 days ago

Pune Crime | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणातील दोन आरोपींना जामीन

3 days ago

Pune Crime | जुन्या वादातून महिलेच्या नावाने अश्लिल मेसेज करुन तिचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याची केली बदनामी

5 days ago

Uddhav Thackeray | ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंद, पण…’; CM उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधत म्हणाले…

5 days ago

MLA Yogesh Kadam | मी शिवसैनिक, कुठल्याही परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार नाही; शिंदे गटाच्या आमदाराच्या ट्विटने प्रचंड खळबळ

3 days ago

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat