• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पुणे : ‘या’ नवीन जागेवर होणार सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 

by Prathmesh Girase
October 24, 2018
in उत्सव
0

पुणे : पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेला ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यंदा मकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल या नवीन जागेवर होणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ १२ ते १६ डिसेंबर होणार आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ही माहिती दिली.

हा  महोत्सव गेल्या ३२ वर्षांपासून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग  मैदानावर घेतला जातो. मात्र, या संगीत महोत्सवाच्या काळातच शाळेच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्यामुळे मैदान उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे शाळेकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे मंडळ नवीन जागेचा शोध घेत होते. यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक रसिक, संस्थाचालक आणि हितचिंतक यांनी संस्थेशी संपर्क साधून याबाबत काय करता येईल, याबद्दल विचारणा केली. त्यानंतर मकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

महाराष्ट्रीय मंडळाशी भीमसेनजींचा दीर्घकाळ अतिशय निकटचा संबंध होता. मंडळाच्या विविध उपक्रमांत ते सहभागीही होत असत.  महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले यांनी आर्य संगीत प्रसारक मंडळास मुकुंदनगर येथील क्रीडा संकुलातील मैदान या महोत्सवासाठी देण्याचे  मान्य केले, याबद्दल जोशी यांनी आभार व्यक्त केले आहेत.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव दरवर्षीप्रमाणेच दिमाखात आणि अभिजात संगीतातील अनेक नव्या जाणिवांसह यंदाही साजरा होईल आणि त्यासाठी गेली ६५ वर्षे रसिक, हितचिंतक आणि प्रायोजक यांच्याकडून जे सहकार्य मिळत आले, तसेच यापुढेही मिळेल, असा विश्वास श्रीनिवास जोशी यांनी व्यक्त केला आहे.

आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी म्हणाले कि , ‘पुण्यातील अनेक शिक्षणसंस्था महोत्सवास मनापासून आणि विनाअट मदत करण्यास तयार असल्याचेही चित्र यामुळे समोर आले’

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी सुरू केलेला हा अभिजात संगीताचा कार्यक्रम जागतिक पातळीवर वाखाणला गेला आणि रसिकांनी व हितचिंतकांनीही हा महोत्सव आपलाच असल्याचे अनेकदा जाहीरपणे सांगितले. जागाबदलाच्या निमित्ताने या सगळ्या भावनांची उजळणी झाली, असेही जोशी यांनी नमूद केले.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाविषयी

अभिजात संगीताचा जगातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा संगीत महोत्सव म्हणून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव प्रसिद्ध आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी त्यांचे गुरु सवाई गंधर्व यांच्या स्मृतीनिमित्त १९५२मध्ये या महोत्सवाचा प्रारंभ केला. तेव्हापासून गेल्या ६५ वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन केले जाते, यंदाचे हे ६६वे वर्ष आहे. सर्वसामान्य व्यक्तीलाही परवडेल अशा कमीत कमी तिकीट दरांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभिजात संगीताचा हा महोत्सव रसिकांना दरवर्षी अनुभवता येतो.
Tags: आंतरराष्ट्रीयकार्यक्रमपुणेमहाराष्ट्रमहोत्सवसांस्कृतिक
Previous Post

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी, हेलिकॉप्टर मधून केली पुष्पवृष्टी

Next Post

भीमा-कोरेगाव येथील पिडीत ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांना भेटणार

Next Post

भीमा-कोरेगाव येथील पिडीत ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांना भेटणार

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

उत्सव

पुणे : ‘या’ नवीन जागेवर होणार सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 

October 24, 2018
0

...

Read more

हरभजन सिंगवर भडकले चाहते, म्हणाले – ‘भारताचं नाव बदनाम करू नकोस’ ! मागावी लागली जाहीर माफी

2 days ago

‘आग’ लागल्यामुळं 1000 कोटींपेक्षा जास्त नुकसान; BCG, रोटाव्हायरस लसींच्या क्षमतेवर झाला परिणाम – सीरम इन्स्टिट्यूट

2 days ago

Mumbai News : मुंबईत नवजात बालकांच्या खरेदी-विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टर, नर्ससह 9 जणांना अटक

6 days ago

Pune News : कोंढवा खुर्द येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी मनपाच्या बांधकाम विभागाकडून 4 गुन्हे दाखल, पालिकेच्या धडक कारवाईमुळे खळबळ

6 days ago

Pimpri News : सामाजिक सुरक्षा विभागाचा जुगार अड्ड्यावर छापा, 23 जणांवर FIR

6 days ago

सोलापूर विद्यापीठात नापास विद्यार्थ्यांचे गुण वाढविले, रोहित पवार म्हणाले – ‘हा तर हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय’

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat