परिट समाजाचा ‘आक्रोश’ यशस्वी, भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवणार

पंढरपूर : बहुजननामा ऑनलाइन – समाजाच्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे आक्रोश आंदोलन करण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने परिट समाजबांधव सहभागी झाले होते. आंदोलनास ११ आमदार व १ खासदार यांनी भेट दिली.
आ. भारत भालके, आ.नारायण पाटील, आ.दिलीप सोपल, आ.दत्तात्रय सावंत यांनी पाठिब्याचे पत्र दिले. सोलापूर जिल्ह्यातून ५ हजाराहून अधिक समाज बांधव होते. भांडे समितीचा अहवाल येत्या ८ ते १० दिवसात केंद्राला पाठवू असे अश्वासन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी महाराष्ट्र धोबी (परिट) समाज आरक्षण समन्वय समितीच्या शिष्टमंडळास दिले. बैठकीस ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय सा. सचिव दिनेश वाघमारे उपस्थित होते.
गाडगेबाबांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा, २ फेब्रुवारी स्वच्छता दिन साजरा करावा अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. शांतीनाथ कारंडे, जिल्हाध्यक्ष संजय घोडके, स्वप्नील वाघमारे, नामदेव वाघमारे, दयानंद पवार, दत्तात्रय क्षीरसागर तसेच लोकप्रतिनिधींनी आपले समर्थनाचे लेखी पत्र दिले.
Comments are closed.