दलित हा शब्द अपमानकारक नाही : रामदास आठवले
November 5, 2018
वर्धा : बहुजननामा ऑनलाईन – दलित या शब्दाचा खरा अर्थ बऱ्याच जणांना माहीत नसतो. दलित म्हणजे शेड्यूल कास्ट असाच सर्वांचा समज होतो, पण जो आर्थिक व सामाजिक मागासलेला आहे तोच दलित होय. महत्त्वाचे म्हणजे दलित असा शब्दप्रयोग करु नये, असा आदेश उच्च न्यायालयाने पारित केला आहे. न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही सन्मान करतो. मात्र, दलित हा शब्द अपमानकारक नसल्याने आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. असे सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले.
इतकेच नव्हे तर काँग्रेसला ६० वर्षात जे जमले नाही ते मोदी सरकाने पाच वर्षात करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पाच वर्षाचा लेखाजोखा आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. भाजप, सेना व आरपीआय या युती सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात डॉ. बाबासाहेबांचे स्मारक उभे राहिले. इंदूमीलची जागाही मिळाली असून स्टॅच्यू आॅफ लिबर्टीपेक्षाही मोठे स्मारक ६ डिसेंबर २०२० पूर्वी पूर्ण होणार आहे. दलितांसाठी या युती सरकारने विविध योजना राबविल्याने २०१९ मध्येही मोदीच पंतप्रधान होणार आहे. जोपर्यंत भाजपा माझ्यासोबत आहे, तो पर्यंत मी भाजपासोबत आहे. असा बॉन्सरही यावेळी त्यांनी टाकला. इतकेच नव्हे तर “देशात भिडविण्याचे वातावरण निर्माण होत आहे. एकट्या मोदींविरुद्ध सारेच एकत्र येत असल्याने त्याचा आम्हाला आनंद आहे.
विशेष म्हणजे दलितांना आरक्षण मिळत असल्यामुळेच त्यांच्यावरील अत्याचाराचे प्रमाणही वाढत आहे.जात जरी उच्च असली तरी आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्यांनाही २५ टक्के आरक्षण द्यावे. दलित, आदिवासी व ओबीसींसह इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता उच्चवर्णीयांना आरक्षण देऊन त्यांची उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये करावी. वारंवार होणाऱ्या आंदोलनांना तोंड देण्यापेक्षा आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यापर्यंत वाढविण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा, यासाठी मी प्रयत्नरत असल्याचेही आठवले यांनी सांगितले.
इतकेच नव्हे तर भारतीय जनता पार्टी व शिवसेनेने एकत्रित लढावे अशी माझी इच्छा आहे. जरी सेना सोडून गेली तरी आरपीआय भाजपासोबतच राहील, असेही आठवले यांनी म्हंटले आहे.
Comments are closed.