जिजाऊ जन्मोत्सवासाठी आज खा. सुप्रिया सुळे सिंदखेड राजा येथे

बुलडाणा : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मोत्सव १२ जानेवारी रोजी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. खा. सुप्रियाताई सुळे दरवर्षी न चुकता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजात येतात.
यावर्षी देखील त्या या सोहळ्यासाठी आज मातृतीर्थात दाखल होणार आहेत. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त देशभरातून अनेक मान्यवर सिंदखेड राजा येथे येतात. खा. सुप्रियाताई सुळे यांनी पाच वर्षांपूर्वी जिजाऊ जयंतीनिमित्त सिदखेड राजाला येण्याची घोषणा केली होती. त्यानुसार गत पाच वर्षांपासून त्या न चुकता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी येतात.
१२ जानेवारीला सकाळी ११ वाजता त्यांचे सिंदखेड राजात आगमण होणार आहे. त्यानंतर राजवाड्यात जिजाऊंना अभिवादन करुन डॉ. एपीजे अब्दुल कलाम स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन तसेच श्रीमंत लखोजीराजे जाधव खुल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव त्यांच्याहस्ते होणार आह.
यावेळी त्यांच्यासोबत माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, कार्याध्यक्ष संगितराव भोंगळ, जि. प. उपाध्यक्षा मंगलाताई रायपूरे, सभापती दिनकर देशमुख आदींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास पदाधिकारी लोकप्रतिनिधीव कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नरेश शेळके यांनी केले आहे.
Comments are closed.