• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

आंबेडकर जयंती निमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

by pawan
October 25, 2018
in उत्सव
0

पुणे – शनिवारी (दि.14) भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरातमध्ये मोठ्या उत्सवात साजरी होत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या मिरवणूका निघतात त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखा पुणे शहर यांच्या वतीने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी व वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरत्या स्वरुपाचे बदल करण्यात आले आहेत.

पुणे स्टेशन, अरोरा टाॅवर , पिंपरी व वाहतूक व्यवस्थेत असा असणार आहे बदलः

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर

बोल्हाई चाैकातून पुणे स्टेशनकडे, बोल्हाई चाैकातून साधू वासवानी चाैकाकडे,जी.पी.अो जंक्शनकडून बोल्हाई चाैकाकडे, चर्च रोडवरील समाजकल्याण चाैकातून मुद्राणालय रोडने फोटो झिंको प्रेसकडे, अलंकार चाैकातून जहांगीर हाॅस्पीटल चाैकाकडे जाण्यासाठी बंदी असणार आहे.

पार्किंग बाबत असे असणार आहे नियोजन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने आर.टी.अो शेजारी, एस.एस.पी.एम.एस मैदानावर किंवा शाहीर अमर शेख चाैक ते कुंभार वेस ते गाडगीळ पुतळा या रस्त्यावर रहदारीस अडथळा होणार नाही अशा रितीने पार्क करावीत. तसेच मालधक्का चाैक ते बोल्हाई चाैक ते पुणे स्टेशन, बोल्हाई चाैक ते साधु वासवानी चाैक ते डाॅ.बॅनर्जी चाैक या रस्त्यावर अत्यावश्यक सेवेखेरीज सर्व प्रकारच्या वाहनांना नो- पार्किंग करण्यात येत आहे.

अरोरा टाॅवर समोरील नियोजन

दोराबजी चाैकातून अरोरा टाॅवरकडे येण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनावर बंदी घालण्यात आली असून या वाहनचालकांनी दोराबजी ब्लू नाईलकडून पुढे जावे.

तारापोर रोड वरील हाॅटेल ग्रॅण्ड अरोरा टाॅवर चाैकाकडे जाण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांस बंदी घालण्यात आली असून त्या वाहनांनी बॅंक हाऊस – तीन तोफा चाैकातून पुढे जावे.

महात्मागांधी रस्त्त्यावरील हाॅटेल नाझ चाैकातून अरोरा टाॅवर चाैकात येण्यासाठी वाहन चालकांनी नाझ चाैकातून डावीकडे वळून बाटलीवाला बगीचा मार्गाचा वापर करावा.

तीन तोफा चाैक व सिल्वर जुबली मोटर्स चाैकाकडून अरोरा टाॅवर चाैकात येणाऱ्या लोकांनी ईस्ट स्ट्रीट जंक्शनला डावीकडे वळून जावे.

अरोरा टाॅवर चाैकातील डाॅ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने तारापुर रोड ईस्ट स्ट्रीट किंवा अन्य रोडवरील पे-अॅन्ड पार्कच्या ठिकाणी पार्क करावीत.

दोराबजी चाैक ते अरोरा टाॅवर ते ती तोफा चाैक व अरोरा टाॅवर ते नाझ चाैक, तारापोर रोड जंक्शन या रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांकरीता नो- पार्किंग करण्यात आले आहे.

पिंपरी चाैक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चाैकातील वाहतून नियोजन

पिंपरी पुलावरुन शगुन चाैकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक पिंपरी पुलावरुन उजवीकडे वळून भाटनगर मार्गे चिंचवडकडे वळवण्यात येणार आहे. नेहरुनगर चाैकाकडून पिंपरी चाैकाकडे येणारी वाहतूक एच. ए ग्राउंड येथे बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक ही यशवंत नगर चाैक व रसरंग चाैकाकडे वळविण्यात येणार आहे. एच.ए काॅर्नरपासून पिंपरी चाैकाकडे येणारी वाहतूक गांधीनगर येथे बंद करण्यात येणार आहे. सदरची वाहतूक ही पीसीएमसी बिल्डींगकडे वळविण्यात येणार आहे. महावीर चाैकाकडून अहिल्यादेवी चाैकाकडे येणारी वाहतूक डी-मार्ट येथे बंद करण्यात येणार असून सदरची वाहतूक ही ग्रेडसेपरेटर इन मधुन वल्लभनगरकडे वळविण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र बॅंक समोरील ग्रेडसेपरेटर आऊट बंद करण्यात येणार आहे. सदरची वाहतूक सर्व्हिस रोड (मोरवाडी चाैक) ने सोडता जय मल्हार हाॅटेलकडे वळविण्यात येणार आहे. नाशिक फाट्याकडून पिंपरी चाैकाकडे सर्व्हिस रोडने येणारी वाहतूक पिंपरी चाैकाकडे न जाता ग्रेडसेपरेटर केएसबी पंप कंपनी समोरील इन मधुन चिंचवडकडे वळविण्यात येणार आहे. अहिल्यादेवी चाैकाकडून पिंपरी पुलाकडे जाणारी वाहतूक क्रोमा शोरुम व गोकुळ हाॅटेल येथे बंद करण्यात येणार आहे. अहिल्यादेवी चाैक ते पिंपरी पुल हा दुहेरी वाहतूकीस खुला करण्यात येणार आहे.

विश्रांतवाडी परिसरातील वाहतूक व्यावस्थेत बदल

विश्रांतवाडी फाटा ते कळस फाटा व कळस फाटा ते विश्रांतवाडी चाैक या ठिकाणी सायंकाळी पाच ते रात्री बारा पर्यंत विविध मंडळांकडून मिरवणूका काढण्यात येतात. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठी गर्दी होत असते. विश्रांतवाडी चाैकातील संभाव्य गर्दी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत अत्याआवश्यक सेवेतील वाहने वगळता तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आले आहेत.

– पुण्याकडून एअरपोर्ट, टिंगरेनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी मेटल काॅर्नर चाैकातून उजवीकडे वळून काॅमर्स झोन चाैकातून डाविकडे वळून टिंगरेनगर एअरपोर्टकडे जातील. किंवा येरवडा जेल समोरुन पुढे पोस्ट आॅफिस चाैकातील रोडचा वापर करावा.

पुण्यातून बोपखेल, दिघी, भोसरी , आळंदीकडे जाणारी वाहने शांतिनगर चाैकातून डाविकडे वळसा घेवून पुढे 100 मीटर अंतरावर पर्यायी कच्च्यामार्गाचा वापर करुन सरळ मासे मार्केट पर्यंत जावून डावीकडे वळून कळस फाटा येथे यवून आळंदी रोडला जावे
-कळस म्हस्केवस्ती, बोपखेल, दिघी , आळंदीकडून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांनी कळसफाटा येथून टॅंकरोडने उजवीकडे वळून चव्हान चाळीत जावून पर्यायी कच्च्यामार्गाचा वापर करुन शांतीनगर येथे येवून टॅंक रोडने खडकीकडे यावे.

धानोरीकडून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांनी आनंद मंगल कार्यालया शेजारील रोड किंवा भरत ढाबा शेजारील रोडने एअरपोर्ट रोडवर येवून 509 चाैकातून पुण्याकडे येतील.

एअरपोर्ट वरुन खडकी, भोसरीकडे जाणाऱ्या वाहनांनी सिद्धेश्वर चाैकातून नवीन काॅमर्स झोन रोडने काॅमर्स झोन चाैकातून उजवीकडे वळून, मेंटल काॅर्नर चाैकात येवून आळंदी रोडने खडकी भोसरीकडे जावे.

वरील वाहतूक व्यवस्थेतील बदल हे शनिवार दिनांक 14 एप्रिल 2018 रोजी सकाळी सहा ते गर्दी संपेपर्यंत असणार आहेत.या शिवाय पुणे शहरात अनेक ठिकाणाहून बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मिरवणूका निघणार असल्यामुळे मिरवणूक मार्गावरील वाहतूक गरजेणूसार टप्याटप्याने बंद अथवा इतर पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. तरी वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन होणारी गैरसोय टाळावी व पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags: bahujannamaparkingpimpriPune Traffic Police
Previous Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत गिरीश महाजनांनी धरला लेझीमवर ठेका

Next Post

५० लाखाचे खंडणी प्रकरण : आमदार योगेश टिळेकर यांचे प्रतिउत्तर

Next Post

५० लाखाचे खंडणी प्रकरण : आमदार योगेश टिळेकर यांचे प्रतिउत्तर

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

उत्सव

आंबेडकर जयंती निमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

October 25, 2018
0

...

Read more

Video : जीममध्ये घाम गाळताना दिसतेय कॅटरीना कैफ ! सुरू झाल्या ‘अशा’ चर्चा

4 days ago

Coronavirus : देशात ‘कोरोना’चे 10,064 नवीन रूग्ण तर 137 जणांचा मृत्यू, 6 महिन्यांनंतर सर्वात कमी रुग्ण

6 days ago

तुमचं लग्न ठरलंय ? मग फॉलो करा या ‘ब्रायडल ब्युटी रूटीन, येईल नैसर्गिक ग्लो

5 days ago

RBI Recruitment 2021 : रिझर्व्ह बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, 10 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

6 hours ago

जुन्नर तालुक्यात अज्ञात आजाराने 200 कोंबड्या दगावल्या, 10 KM चा परिसर सतर्क क्षेत्र म्हणून घोषित

8 hours ago

Kamal Hassan Admitted to the Hospital : कमस हासन रुग्णालयात भरती ! जाणून घ्या कारण

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat