६ डिसेंबर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्य ६२ व्या महापरिनिर्वाणा दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षातर्फे दुपारी ३ वाजता शिवाजी पार्क दादर येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार असल्याचे मुंबई रिपाइंचे अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर या सभेत आंबेडकर अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइंतर्फे करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए) च्या वतीने केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २८ वर्ष आणि त्याआधी भारतीय दलित पँथरपासून अंदाजे सुमारे ४१ वर्षांपासून दरवर्षी शिवाजी पार्क येथे दि ६ डिसेंबरला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही शिवाजी पार्क येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी रामदास आठवलेंच्या अध्यक्षतेत जाहीर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. रिपाइंचे देशभरातील सर्व राज्यप्रमुख आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे नेते उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.