हिंगोली : बहुजननामा ऑनलाईन – हिंगोलीजवळ असलेल्या गरमाळ परिसरात रेशन दुकानावरु भाजप आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांनमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या हाणामारीत ६जन गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, रेशन दुकानाची चौकशी करण्यासाठी हिंगोली तहसीलचं पथक आलं होतं. मात्र पंचनामा सुरु असताना तहसील कर्मचाऱ्याला मारहाण झाली. यानंतर भाजप कार्यकर्ते हमीद प्यारेवाले आणि एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख बुऱ्हाण पहेलवान यांचे दोन गट आपापसात भिडले. या गटांमध्ये लाठ्या-काठ्यांसह तुंबळ हाणामारीला सुरुवात झाली. शिवाय या दरम्यान दगडफेक करण्यात आली.
दरम्यान या हानामारीत १५ ते १६ जण जखमी झाले असून सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर गारमाळ गावातील परिस्थिती आता नियंत्रणाखाली आहे. गारमाळ आणि शासकीय रुग्णालयात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.