पुणे : बहुजननामा ऑनलाइन –सत्यशोधक ओबीसी फेडरेशनसह अन्य पंधरा संस्थांनी सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हांमधून कामळातील शनिवार वाडा काढून जागी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची प्रतिमा लावा अशी मागणी करण्यात आली आहे.
१० फेब्रुवारी १९४८ मध्ये मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. १९५० साली या विद्यापीठाचे कमळात शनिवार वाडा असे बोधचिन्ह तयार करण्यात आले. दरम्यान इ.स. २००४ साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठाचे आधीचे नाव बदलून सावित्रीबाई फुले विद्यापीठ करावे अशी मागणी करण्यात आली होती. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. पुणे विद्यापीठाच्या नावाशी, स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचलेल्या सावित्रीबाई फुले यांचे नाव जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ७ जून २०१४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाला.
दरम्यान पुणे विद्यापीठाचे नामांतरण झाल्या नंतरही जुने बोधचिन्ह बदलण्यात आलेले नाही.त्यामुळे बोधचिन्हात तात्काळ बदल करावा व फुले यांचा पुतळा विद्यापीठ परिसरात उभारण्यात यावा अशी मागणी सत्यशोधक ओबीसी फेडरेशनसह अन्य पंधरा संस्थांनी केली. विशेष म्हणजे सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निम्मित हि मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे मुलींना शिक्षणाची दारे खुले करणाऱ्या सावित्रीमाईंचे नाव विद्यापीठाला देणे योग्य आहेच मात्र बोधचिन्ह त्यांची प्रतिमाही वापरायला हवी. असे सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे सचिन माली यांनी म्हंटले.